मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात हालचालींना निर्णायक वेग आला आहे. अर्थात आज महाविकास आघाडीची सर्वात महत्त्वाची बैठक ज्यामध्ये जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार आहे ही बैठक काही वेळातच सुरू होते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये महत्त्वाचा विषय हा असणार आहे की वंचित बहुजन आघाडीला नेमक्या किती जागा महाविकास आघाडी कडून दिल्या जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काल प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. जागा वाटपावरून महाविकास आघाडीच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु आजच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे स्वतः उपस्थित आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे ,शरद पवार ,बाळासाहेब थोरात ,प्रकाश आंबेडकर हे प्रमुख नेते उपस्थित राहून आज जागा वाटपाचा अंतिम निर्णय होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे.