सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेल आहे. महायुती आणि महाआघाडीमधून नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच आता महादेव जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना शरद पवारांनी उमेदवारी निश्चित केली. यावेळी माध्यमांशी बोलताना महादेव जानकर यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” भाजपने आम्हाला मंत्रीपदाचा एक बैल दिला होता. तो आम्ही भाजपकडे धनगर आणि ओबीसी समाजाची मते मिळवून त्यांना परत केला. मात्र भाजपने आमचा आमदार फोडला, आम्हाला लोकसभेला जागा नाकारली. माढा लोकसभेतून शरद पवार यांनी उमेदवारी निश्चित केली असल्याची माहिती यावेळी महादेव जानकरांनी दिले आहे.
महादेव जानकर म्हणाले की, ” लोकसभा निवडणूक हा फक्त ट्रेलर असेल खरा पिक्चर तर विधानसभेत दिसणार असल्याचा इशारा, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप आणि महायुतीला दिला आहे. भाजपने मला डावल्याने सगळ्या 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला फटका बसेल असा दावा देखील त्यांनी केला आहे. भाजपवर हल्लाबोल करतानाच त्यांनी शरद पवार यांचे आभार व्यक्त करताना म्हटले आहे की, ” शरद पवार यांनी मला हेरले. विश्वास टाकला, त्यांचा फायदा महाविकास आघाडीला होणार असून मी माझ्या रासप चिन्हावर लढणार असल्यासच त्यांनी म्हटल आहे.