महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर देशभरात आज 102 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. आता बॉल मतदात्याच्या कोर्टात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान पार पडते आहे.
देशातील 102 जागांवर हे मतदान पार पडते आहे. तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात आज मतप्रक्रिया पार पडते आहे. 21 राज्यांमध्ये 102 मतदार संघात 1625 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान आज सकाळी सहा वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आज पहिल्या टप्प्यातील म्हणजेच रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर ,चंद्रपूर या मतदारसंघात मतदान पार पडते आहे. तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे.
नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब उपस्थित राहून मतदान केले आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी देखील सहकुटुंब उपस्थित राहून मतदान केले आहे.