बारामती : बारामतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवारांविरोधात शंख फुंकला आहे. यंदाची लोकसभा निवडणूक Lok Sabha Elections 2024 बारामतीतून लढवणारच असा निर्धार त्यांनी केला आहे. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ही प्रतिष्ठेची लढत मानली जाते आहे. दरम्यान या लढतीमध्ये आता विजय शिवतारे यांनी अपक्ष लढणार असल्याचं थेट जाहीरच केला आहे.
विजय शिवतारे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या विरोधात थेट वक्तव्य केली आहेत. ते म्हणाले की, “बारामती मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही, देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे आणि मालकी कोणाची नाहीये. सहा विधानसभेचे मतदार संघ आहेत आणि म्हणून पवार पवार करण्याऐवजी आपल्याला निश्चितपणे आपला स्वाभिमान जागृत करून आपण लढलं पाहिजे. विशेषत: अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता, तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता.”
तसेच ” अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मला बायपास करायला सांगितली, मी नाही केली. स्टेन टाकल्या फेल झालं आणि मी संपूर्ण प्रचार अॅम्बुलन्समधून केला.मरायला लागलेला आहे, तर कशाला निवडणूक लढवतोय. तुम्ही खोटं बोलतायत, असंही म्हणाले. पण लोकांची साथ हाती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं काम. माझी गाडी, मग ती कोणत्या कंपनीची इतक्या खालच्या थराला अजित पवार आले. तू पुढे कसा निवडून येतो, तेच मी पाहतो. महाराष्ट्राभरात मी कोणाला पाडायचं ठरवलं, तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि पाडतो म्हणजे पाडतोच, असंही म्हणालेले. राजकारणात कोणलाही निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी, निवडून आणणार म्हणजे आणणारच. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काढी ओढायला, पण गाव वसवायला अनेक हात लागतात, त्यामुळे अशी उर्मट भाषा त्यांनी केलेली.” असा थेट हल्लाबोल शिवतारेंनी केला आहे.
https://www.facebook.com/share/v/mYJ7CkSUt5SQ9Rxz/?mibextid=w8EBqM