मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्के पचवत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वेग घेतला आहे. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने मात्र 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येते आहे.
एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवलं आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 23 जागांची मागणी केली आहे.
ठाकरे गटाने शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार :
▪️ शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
▪️ बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
▪️ ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
▪️ रायगड – अनंत गीते
▪️ रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
▪️ दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
▪️ वायव्य मुंबई – अमोल कीर्तीकर
▪️ संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
▪️ धाराशिव – ओमराजे निंबाळकर
▪️ परभणी – संजय जाधव
▪️ ठाणे – राजन विचारे