लोकसभा निवडणूक 2024 : अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीचे Lok Sabha Elections 2024 सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत अर्थात महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आमदारकी सोडून निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली आहेत. आता या दोन उमेदवारांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात खानदानी वारसा असलेले मुरलेले मातब्बर खेळाडू सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंना एक वेगळाच आव्हान दिला आहे सुजय विखे पाटील म्हणाले की मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं थेट आव्हानच त्यांनी दिला आहे.
पुण्यात विवाह मंडपात वधू-वराकडून मतदानाची शपथ; नवदांपत्याचा मतदात्यांना स्तुत्य संदेश
सुजय विखेंच्या या आव्हानाला निलेश लंकेने देखील थेट शब्दात प्रत्युत्तर दिल आहे. निलेश लंके म्हणाले की, ” आपण कुठल्या भाषेत बोलतो यापेक्षा आपण सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडतो याला महत्त्व आहे. घटनेनुसार सर्वांना आपल्या मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे संसदेमध्ये वेगवेगळ्या राज्यातील लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या भाषेत बोलतात आपण किती प्रभावीपणे मुद्दे मांडतो आणि ते कसे पूर्ण करून घेतो याला महत्त्व आहे.” असा टोला निलेश लंके यांनी लगावला आहे.
सुजय विखे पाटील यांना नगर मधून मोठा राजकीय वारसा आहे. तर दुसरीकडे निलेश लंके यांनीदेखील बरंच काम केलं आहे. त्यामुळे अहमदनगरची ही निवडणूक चुरशीची होणार आहे.