सातारा : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. महाविकास आघाडीचे काही जागा वाटपाचे तिढे अद्याप सुटलेले नाहीत. या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर एक भूमिका घेतात तर महाविकास आघाडीचे नेते मात्र वेगळी भूमिका घेत आहेत.
आज ज्येष्ठ नेते शरद पवार हे साताऱ्यात आहेत. साताऱ्यामध्ये आज त्यांनी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक विधान केले आहे. ते म्हणाले की, ” यावेळीची निवडणूक तीन पक्षांनी एकत्र घेऊन लढायची आहे…! ” शरद पवारांच्या या विधानामुळे एका अर्थी त्यांनी हे स्पष्टच सांगून टाकलं आहे का की यावेळी केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना हे तीनच पक्ष ही निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडी मात्र या महाविकास आघाडीमध्ये सामील होणार नाही अशा चर्चांना उधाण आले आहे.
https://www.facebook.com/share/v/5wxSMZM14upXxxm9/?mibextid=xfxF2i
खरंतर एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या मनामध्ये आढी बसली आहे. आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले उमेदवार देखील घोषित करण्यास सुरुवात केली आहे. असं असताना अद्याप देखील महाविकास आघाडीचे काही नेते हे प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करत असल्याचं म्हणत आहेत. त्यात आज साताऱ्यामध्ये शरद पवारांच्या या विधानामुळे वेगळाच चर्चेला उधाण आले.
नेमकं काय म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार
आज साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी आपल्या उमेदवाराबाबत घोषणा करण्याबाबत वक्तव्य केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ” मी मुद्दाम साताऱ्यात आलो आहे. मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. या जागेसाठी एकापेक्षा अधिक लोक आग्रही आहेत. त्यामुळे या जागेसाठीच्या उमेदवाराची येत्या दोन ते तीन दिवसात घोषणा करू. प्रकृतीमुळे मी निवडणूक लढवू शकत नाही. मात्र मी पक्षाचं काम करत राहणार असल्याच श्रीनिवास पाटील यांनी सांगितल्याचं शरद पवार म्हणाले आहे. तसेच या वेळची निवडणूक तीन पक्षांनी एकत्र घेऊन लढायची आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.