मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर कोणाला कुठून उमेदवारी मिळणार याबाबतचा पेच बऱ्याच प्रमाणात आता निवळत आला आहे. महायुतीच्या वतीने काही ठराविक जागांवरचा तिढा सुटता सुटत नव्हता तर काही जुने जाणते नेते देखील उमेदवारी न मिळाल्याने महायुतीवर नाराज होत होते. यामध्ये एक नाव होतं ते म्हणजे रासपचे प्रमुख महादेव जानकर Mahadev Jankar यांच…
महादेव जानकर हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. महायुतीकडे त्यांनी आपली इच्छा व्यक्त देखील केली होती. आणि दोन जागांची मागणी केली होती. मात्र आज पर्यंत महायुतीने त्यांना कोणतही ठोस उत्तर दिलं नाही. त्यामुळे ते नाराज होऊन शरद पवार यांच्या भेटीला देखील गेले होते. पण अर्थातच महायुतीला जाणकारांचे जाणे परवडणारे नव्हते. त्यामुळे महायुतीने आज त्यांना परभणी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे.
काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यामध्ये परभणी लोकसभा मतदार संघा ंमध्ये महादेव जानकर हे अधिकृत उमेदवार असल्याचं त्यांनी घोषित केलं. त्यामुळे आता परभणीत विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरुद्ध रासपचे प्रमुख महादेव जानकर अशी लढत निश्चित झाली आहे.
Ambadas Danave : ” माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे…! ” , अंबादास दानवेंनी भाजपा पक्षप्रवेशाबाबत स्पष्टच सांगितले…
आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, महायुती पासून मी कधीही दूर गेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस , भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद इथे आमच्या सोबत आहे. परभणीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या कसा विकास होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं महादेव जानकर यांनी यावेळी म्हटले आहे.