पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षाच्या एकनिष्ठेनंतर वसंत मोरे यांनी सोडचिठ्ठी दिली. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. तर त्यानंतर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
दरम्यान मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच मुंबईला जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. आणि त्यानंतर पुण्यात येऊन रवींद्र धंगेकरांची देखील त्यांनी भेट घेतली. त्यामुळे महा विकस आघाडीमध्ये ते सामील होणार हे स्पष्ट झाले होते.
दरम्यान आज त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केला आहे. ते म्हणाले की, ” मला महाविकास आघाडीकडून संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि पुणेकरांच्या भल्यासाठी माझा महा विकास आघाडी विचार करेल अशी खात्रीही वसंत मोरे यांनी व्यक्त केली. जो पक्ष पुण्यात विजयी होईल आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करेल त्या पक्षासोबत वसंत मोरे कायम असतील असे देखील यावेळी वसंत मोरे म्हणाले आहेत.