बारामती : बारामतीमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये सातत्याने शाब्दिक युद्ध सुरूच आहे. माझ्यावर जनतेचा दबाव असून आता माघार घेता येणं शक्य नाही असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले विजय शिवतारे
दरम्यान बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान आता अजित पवारांच्या सातत्याने विरोधात वक्तव्य करणारे विजय शिवतारे यांनी देखील आता बंड पुकारल आहे. ते म्हणाले की, ” अगदी भाजपच्या चिन्हावर लढायची गरज पडली तरी माझी हरकत नाही. मी कमळावर लढायला तयार आहे. लोकांशी विचार मंथन करून मी या निर्णयापर्यंत आलोय. अपक्ष लढणं हा नंतरचा भाग आहे. तर जनता म्हणते की बापू तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे मी आता खूप पुढे गेलोय आता माघार घेऊ शकत नाही महायुतीचा माझ्यावरती दबाव आहे. अनेक नेते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझ्यावरती बारामतीतल्या जनतेचा दबाव आहे. आणि त्यामुळे आता माघार घेणं शक्य नाही. अशी राजकीय भूमिका विजय शिवतारे यांनी स्पष्ट केली.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विजय शिवतारे यांचे अनेक दिवसांपासून अजित पवारांशी शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान आता महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार महाआघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे हे लोकसभेच्या रिंगणात असून विजय शिवतारे आता पुढे लोकसभेसाठी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.