मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान Lok Sabha Election Updates आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.
मुंबईमध्ये मतदान प्रक्रियेला अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येते आहे. तर मुंब्रा आणि कळव्यात मतदार प्रचंड संतापले आहेत. मतदानास आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागत असल्या कारणाने मतदार संतापले आहेत. तर कालव्यात काही मतदारांना परत पाठवून दिल्याचा धक्कादायक आरोप जितेंद्र यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, “मतदान स्लो, स्लो होतय. तीन-चार तास झालेत. जो पर्यंत मतदान करायला मिळणार नाही, तो पर्यंत इथून जाणार नाही. रात्री 11 वाजून गेले तरी चालतील, मतदान करुनच जाईन” अस मतदानासाठी आलेल्या महिलेने ठणकावून सांगितलं. हे सर्व मुद्दामून सुरु आहे असं एक अन्य मतदार म्हणाला. “मी निवडणूक निरीक्षक मनोज जैनशी बोललो. काही अधिकारी मुद्दामून करतायत. खुसपट काढतायतय. हे इथेच नाही, कळव्यात सुद्धा चालू आहे. लोकांना परत पाठवल जातय” असा धक्कादायक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तसेच “सहा वाजता जो मतदार मतदानासाठी रांगेत उभा राहिलं, त्याला कितीही उशीर लागला, रात्रीचे 11 वाजू दे तरी तो मतदान करणारच. मी या बद्दल लवकरच एक व्हिडिओ पोस्ट करीन” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “कायदा आहे, तेच कायदा सांगतो. जेढा वेळ वाया जाईल, तेवढा मतदानाला द्यावाच लागेल. सहा वाजता जेवढी लोक इथे असतील तेवढ्या लोकांकडून मतदान करुन घ्यावच लागेल” असा जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
पुण्यात दारुड्यांचा कहर : एकाने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले, दुसऱ्याने जन्मदात्या आईची केली हत्या, तर धनदांडग्याच्या कारने दोघा जणांना चिरडले, पुण्याचा नाईट लाईफचा विद्रूप चेहरा, CCTV VIDEO
पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघ निहाय टक्केवारी
भिवंडी- 48.89 टक्के
धुळे- 48.81 टक्के
दिंडोरी- 57.06 टक्के
कल्याण – 41.70 टक्के
मुंबई उत्तर – 46.91 टक्के
मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के
मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के
मुंबई दक्षिण – 44.22 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
नाशिक – 51.16 टक्के
पालघर- 54.32 टक्के
ठाणे – 45.38 टक्के