अहमदनगर : आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. यामध्ये आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडते आहे. दरम्यान एक मोठी बातमी आता अहमदनगरमधून समोर येते आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच सुजय विखे आणि निलेश लंके यांच्याकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत.
बारामती प्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात देखील मतदानाच्या रात्री पैशांचा पाऊस पडत असल्याचा धक्कादायक आरोप अहमदनगर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखेंवर केला आहे. त्याचबरोबर या आरोप प्रत्यारोपांच्या फेरीमध्ये जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील गावागावात पाकीट करण्यात आल्याचा आरोप विखेंवर केला आहे.
बारामतीतून मोठी बातमी : EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं CCTV फुटेज तब्बल 45 मिनिटे बंद; सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण
यावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ” 2019 मध्ये रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल असल्याचा आरोप सुजय विखे यांनी केला. तर पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे पैसे नेमके कोणाचे आहेत. हे सांगायला नको. अहमदनगर जिल्ह्यातील गुंडगिरीच राज्य पारनेरमधील जनताच उध्वस्त करणार अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.