धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत. धाराशिवमध्ये आज महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले.
महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार धाराशिव मध्ये उपस्थित होते उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज धाराशिवच्या प्रमुख रस्त्यांवर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीचा आज मतदानाचा पहिला टप्पा महाराष्ट्रामध्ये पार पडतो आहे. यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघांचा मतदानाचा टप्पा पार पडला आहे. देशातील 102 जागांवर हे मतदान पार पडले आहे. तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात आज मतप्रक्रिया पार पडली आहे. 21 राज्यांमध्ये 102 मतदार संघात 1625 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान आज सकाळी सहा वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. आज पहिल्या टप्प्यातील म्हणजेच रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान पार पडले आहे.