मुंबई : आज महाराष्ट्र स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ सुरू आहेत. यावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी भाष्य केल आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. त्या दिवसापासून उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे सातत्याने टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज देखील उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करताना म्हटले आहे की, ” घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहत नाही काम करणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहतो..! ” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
65 वा महाराष्ट्र स्थापना दिन : समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवूया; मतदानाचा हक्क बजावण्याचे राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन
त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमध्ये नाशिकच्या जागेच्या तिढ्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. यावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवारांची घोषणा लवकरच होईल. त्याचबरोबर मुंबईतील सहा जागा महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त करतानाच शिक्षण आरोग्य पायाभूत सोयी सुविधांकडे आम्ही लक्ष देत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितल आहे.