कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते विरोधकांवर बोचरी टीका करताना सध्या दिसून येते आहे. आज कोल्हापूरमध्ये रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी शरद पवारांवर Sharad Pawar बोचरी टीका करताना म्हटले आहे की, ” देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis हा एकच व्यक्ती असा भेटला की तो शरद पवार यांना पुरून उरला.
नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत
माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत म्हणाले की, ” गेल्या 70 वर्षापासून महाराष्ट्रात मुठभर सरदारांचं राज्य होतं. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे शरद पवारांसारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली. पण पवार तुमची जात वेगळी असती, तुमचं नाव फडणवीस असतं तर या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही हुंगलं नसतं. देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरून उरला. त्यामुळे या वयातही शरद पवार यांना खोटं बोलत रेटून चालावं लागत आहे. ” अशी बोचरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सदाभाऊ खोत यांनी गौरवोद्गार काढत म्हटले आहे की, ” यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी तळागाळातला समाज उभा राहील. आम्ही सर्व लहान घटक पक्ष भाजपसोबत आहोत. कारण ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया आघाडीत असणारे सगळे लुटारू आहेत. सगळे अलीबाबाचे साथीदार आहेत. इंडिया आघाडीला या निवडणुकीत मूठ माती मिळणार..! ” असं देखील सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
यावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.