कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य आहे. कोल्हापूर हे शाहू महाराजांचं शहर आहे. आजही या शहराची ओळख अशीच आहे. कोल्हापूरमध्ये महाराजांच्या वंशावळीबाबत खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांच्या विधानाने राज्यभरात खळबळ माजली आहे.
भाजपचे खासदार संजय मंडलिक यांनी चंदगड तालुक्यातील नेसरी येथे एका सभेमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ते म्हणाले होते की, ” आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही मग कुस्ती कशी होणार ? असं वक्तव्य मंडलिक यांनी केलं होतं.
कोल्हापूरचं वातावरण तापलं ! ” आत्ताचे महाराज खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत..! ” संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. संजय मंडलिक यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. पण मंडलिक यांनी थेट नकार देत एक शब्द चुकलो असे म्हणत मी अपमान केला नाही. तुम्ही दत्तक आहात की नाही ? याचे उत्तर द्या असा थेट सवाल केला आहे.