कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठीच्या महाविकास आघाडीचा जो तिढा होता तो आता सुटला आहे. काँग्रेस आणि शिवसेना दोघेही या जागेसाठी आग्रही होते. काँग्रेसला ही जागा शाहू छत्रपतींसाठी हवी होती. आजच्या निर्णयाक बैठकीमध्ये अखेर शिवसेनेने माघार घेतली आहे. आणि आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही शाहू छत्रपती लढवणार आहेत.
यावर संभाजी राजे छत्रपती यांनी देखील आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे. संभाजी राजे या लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहणार हे जवळपास निश्चित होतं. परंतु आता त्यांनी थेट शाहू छत्रपतींना लोकसभा निवडणुकीची जागा निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट माघार घेतली आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ” कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज ही जागा लढवत असतील तर माझा प्रश्न येत नाही. महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. माझ्या निवडणुकीत 100% काम केलं होतं, तर महाराज यांच्या प्रचारात आता 1000% काम करणार ” असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
संभाजीराजे छत्रपतींना आपला थेट पाठिंबा शाहू छत्रपती देत असतानाच म्हटले की जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहेत. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही. कष्ट करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. स्वराज्य संघटना ही कुठेही निवडणुकीत उभे राहणार नाहीत आणि शाहू महाराज , मालोजीराजे आणि मी एकत्रपणे या निवडणुकीत काम करणार असल्याचं संभाजी राजे छत्रपतींनी म्हटल आहे.