जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता जागा वाटपाचा तिढा बराच सुटला आहे. तर आता राजीनामा नाट्य सुरू झाले आहे. आजची मोठी बातमी समोर येते आहे. भाजपचे नाराज खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले आहेत.
यंदा भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. आणि त्यानंतर उन्मेश पाटील हे नाराज होते. दरम्यान या नाराजी नंतर आज त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबईत थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज संजय राऊत यांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे उमेश पाटील हे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना उन्मेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ” ही मैत्रीपूर्ण भेट होती. मी लवकरच यावर सविस्तरपणे बोलेन. आता काही बोलणे उचित नाही. संजय राऊत आणि आम्ही संसदेत एकत्र काम केलं आहे. राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपावी लागते. आमची नेहमी चर्चा होत असते. प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका. आपल्या सर्वांचा मी मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न आपल्या मनातील सगळे प्रश्न यावर मी सविस्तर आपल्याशी बोलेन. आता मला असं वाटतं की मी आज बोलणं उचित नाही. तुम्हाला नाही म्हणताना वेदना होत आहेत. उद्या सकाळी यावर सविस्तर बोलेन असं माध्यम प्रतिनिधींना उमेश पाटील यांनी सांगितला आहे.
Mumbai Breaking : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; Video Viral
दरम्यान आपल्या नाराजीनंतर भाजपला सोडचिठ्ठी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट यावर उन्मेश पाटील यांनी जरी थेट भाष्य केलं नसलं तरी आता ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार अशा चर्चेला उधाण आला आहे. यावर उद्या सकाळी बोलेन असे स्पष्टीकरण उमेश पाटील यांनी दिल आहे. त्यामुळे उद्या सकाळी आता यावर ते काय भूमिका घेतात हे स्पष्ट होईल.