जालना : जालन्याच्या अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा बडगा उगारला आहे. दरम्यान त्यांची प्रकृती सातत्याने ढासाळत आहे.
आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. 10 फेब्रुवारीला त्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आतापर्यंत झालेली दगदग पाहता आणि अन्न पाणी सोडल्यामुळे या चार दिवसांमध्ये त्यांची प्रकृती प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यांचे हात थरथरत आहेत. तसेच बोलणे सुद्धा खूप जड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.
त्यांचे सहकारी सातत्याने त्यांना पाणी पिण्यास आणि उपचार घेण्यास विनंती करत असताना देखील जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. पाणी देखील पिणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
जरांगे पाटील यांचे उपोषण एकीकडे सुरू आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या हालचाली सुरू आहेत. अशातच आता राज्य सरकार जरांगे पाटील यांच्या या भूमिकेवर कसा तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ashok Chavan joins BJP : … आणि अखेर आज भाजपमध्ये जातोय ! अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगून टाकलं