मुंबई : महाराष्ट्रमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आहे. पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर आज लोकसभेच्या आठ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडते आहे. दरम्यान आज हिंगोलीमध्ये विचित्र प्रकार पाहायला मिळाला. ईव्हीएम EVM मशीन बंद पडल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : नारायण राणेंच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी
दरम्यान संजय राऊत यांनी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटनेबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ” हे वारंवार होतं किंवा केलं जाईल. अमरावतीमध्ये तर कुठेही आघोरी कृत्य होऊ शकेल. वर्धामध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा षड्यंत्राचा भाग असू शकतो. आणि संध्याकाळ नंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात. आणि नंतर ज्यांना हव्या आहेत त्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणे हे या निवडणुकीच्या यंत्रणेत मोदी कृत भाजपचे षडयंत्र आहे. ” असा थेट आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.