नवी दिल्ली : आज नवी दिल्लीमध्ये एनडीएची NDA महत्त्वाची बैठक पार पडते आहे. भाजपच्या BJP नेतृत्वातील एनडीएच्या घटक पक्षांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक पार पडत असून या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी Narendra Modi यांची एनडीएने नेतेपदी निवड केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Election 2024 भाजपला 240 तर NDA ला 293 जागा मिळाल्या आहेत. देशांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 272 एवढे बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा येत्या 9 जूनला सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. दरम्यान आजच्या या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि एनडीएचे घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान या बैठकीसाठी हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम देशाच्या संविधानाला नमन केले.
https://www.facebook.com/share/v/xDRErQCrVWZ5xwDC/?mibextid=qi2Omg
मोठी बातमी : नरेंद्र मोदी 9 जूनला घेणार पंतप्रधान पदाची शपथ ! NDA च्या नेतेपदी निवड
भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी
आजच्या या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. यावेळी त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे ईव्हीएम मशीनचा! ते म्हणाले कि, ” 4 जून रोजी निकाल लागला, मी माझ्या कामात व्यग्र होतो. पण मी एका माझ्या सहकाऱ्याला विचारलं की देशात ईव्हीएम जिंवत आहे का, की ईव्हीएम मरुन गेले आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडावा यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला. विरोधक ईव्हीएम मशिनवर टीका करायचे. मला तर वाटलं होतं, निकालानंतर ते ईव्हीएमची तिरडी काढतील. पण 4 जून रोजी संध्याकाळपर्यंत ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाची ताकद आहे. 2029 साली ते पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनला घेऊन टीका करायाला सुरुवात करतील. निवडणुकीच्या काळात प्रत्येक तीन दिवसांनी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा कसा आणता येईल, यासाठी प्रयत्न केले. निवडणूक आयोगावर आरोप करायचा, निकाल काहीही लागू देत भारताची जगात बदनामी करायची, असा विरोधकांनी कट रचला होता. देश त्यांना कधीही माफ करणार नाही. अशी जोरदार टीका नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे .