कोल्हापूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अद्यापही लागलेली गळती सुरूच आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच लक्ष हे राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर आहे. परंतु एकंदरीत पक्षाच्या कारभारावर अद्यापही अनेक नेते आणि पदाधिकारी नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी तीस वर्ष शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले मुरलीधर जाधव हे आपल्या पाच हजार शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
याविषयी मुरलीधर जाधव यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ” मी गेली 30 वर्ष शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख असा प्रवास केला. ठाकरे गटाने जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर दीड महिने त्यांनी चौकशी देखील केली नाही. मला बाजूला हो म्हटलं असतं तर मी झालो असतो. मात्र हकालपट्टी करणे हे माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटणार आहे. त्यामुळे काल राजीनामा दिला. अशी माहिती मुरलीधर जाधव यांनी दिली आहे.
सुजित मिणचेकर आणि सुषमाताई अंधारे यांनी माझ्या विरोधात कान भरले
यावेळी मुरलीधर जाधव यांनी माजी आमदार सुजित मिणचेकर आणि सुषमाताई अंधारे यांनी माझ्या विरोधात कान भरल्याच थेट वक्तव्य केल आहे. त्यानंतर मातोश्री वरून दीड महिने झाले तरी कोणीही संपर्क केला नाही. हे आपल्या नाराजीच प्रमुख कारण असल्याच त्यांनी सांगितलं.
शनिवारी होणार मुरलीधर जाधव आणि 5000 शिवसैनिकांचा पक्षप्रवेश
दरम्यान मुरलीधर जाधव यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून उद्या शनिवार दिनांक 17 फेब्रुवारीला ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी हुपरीतून पाच हजार शिवसैनिकांसह भव्य रॅली काढण्यात येणार असून ही पदयात्रा सभास्थानी जाणार असल्यास त्यांनी सांगितल आहे.