नवी दिल्ली : नवी दिल्लीमध्ये सध्या प्रचंड खलबती सुरू आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगातूनच दिल्ली चालवत आहेत. अशातच अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करावं अशी याचिका दिल्ली हायकोर्टमध्ये Delhi High Court दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने याचिका कर्त्याला फटकारल आहे.
दिल्ली हायकोर्टाने यावेळी सुनावणी दरम्यान स्पष्ट केले आहे की, ” या प्रकरणांमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाला वाव नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर केजरीवालच असणार हे स्पष्ट झाले. सध्या परिस्थितीमध्ये तुरुंगातूनच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सरकार चालवत आहेत. परंतु त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले जावे अशी याचिका सुरजीत सिंह यादव या व्यक्तीने दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.
काय आहे कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्री प्रकरण ?
कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर गुन्ह्याच्या प्रक्रिये दरम्यान आम आदमी पार्टीला 338 कोटी रुपये पोहोचल्याच ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. अबकारी घोटाळ्यातील आरोपी इंडोस्पिरिटचे संचालक समीर महेंद्र यांनी पोलिसांना चौकशी दरम्यान माहिती दिली होती की, अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्ती यांपैकी विजय नायरने फीस टाईमद्वारे केजरीवाल यांना भेटण्यास सांगितले होते. यावेळी स्वतः केजरीवाल यांनी विजय नायर हा त्यांचा खास माणूस असल्याचं सांगितलं होतं. तसेच अरविंद केजरीवाल यांच्या घरी नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत बैठक झाली असल्याचे देखील तपासात उघड झालं आहे. दरम्यान मनीष सिसोदिया यांचे तात्कालीन सचिव सी अरविंद यांनी चौकशी दरम्यान माहिती दिली होती की, अबकारी धोरणात सहा टक्के इतका नफा होता. जो अरविंद केजरीवाल यांच्या सहमतीने बारा टक्के पर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा देखील या प्रकरणात हात होता. तसेच मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयासमोर 338 कोटी रुपयांचा मनी ट्रेल ठेवला होता. यात स्पष्ट करण्यात आले होते की, उत्पादन शुल्क धोरणादरम्यान 338 कोटी रुपये होते. दारू माफियांमधून आम आदमी पक्षापर्यंत ते पोहोचले अरविंद केजरीवाल हे पक्षाचे प्रमुख असल्याकारणाने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना अटक केली आहे.