नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून आज महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आहे . यामध्ये विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे.
देशभरामध्ये 88 लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे यामध्ये ,
- केरळमध्ये – 20
- कर्नाटकातील – 14
- राजस्थानमधील – 13
- महाराष्ट्रातील – 8
- उत्तर प्रदेश मधील – 8
- मध्यप्रदेश मधील – 6
- आसाम मध्ये – 5
- बिहारमध्ये – 5
- छत्तीसगडमध्ये – 3
- पश्चिम बंगालमधील – 3
- जम्मू काश्मीर
- त्रिपुरा – 1 अशा देशातील 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.
बुलढाणा- प्रतापराव जाधव (शिवसेना) – विरुद्ध – नरेंद्र खेडेकर (उबाठा)
अकोला- अनूप धोत्रे (भाजप) विरुद्ध अभय पाटील (काँग्रेस) – विरुद्ध – प्रकाश आंबेडकर (वंचित)
अमरावती- नवनीत कौर राणा (भाजप) विरुद्ध बळवंत वानखडे (काँग्रेस) – विरुद्ध – आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) विरुद्ध दिनेश बूब (प्रहार)
वर्धा- रामदास तडस (भाजप) – विरुद्ध – अमर काळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
यवतमाळ- वाशिम- राजश्री पाटील (शिवसेना) – विरुद्ध – संजय देशमुख (उबाठा)
हिंगोली- बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना) – विरुद्ध – नागेश पाटील आष्टीकर (उबाठा) शिवाजी जाधव (भाजप बंडखोर)
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) – विरुद्ध – वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
परभणी- महादेव जानकर (राष्ट्रवादी) – विरुद्ध – संजय जाधव (उबाठा)