पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा ठरल्या आहेत. प्रत्येक पक्षांमधून उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. काही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात देखील केल्याची चित्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पुण्यामध्ये महायुतीची पुणे, शिरूर, बारामती लोकसभा मतदार संघातील महिला आघाडीची बैठक पार पडली. भाजपचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी या बैठकीला मार्गदर्शित केले.
“महायुतीकडून विजयासाठी एकजुटीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आमचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. आम्हाला समोरून कोणतेही आवाहन वाटत नाही, आम्हाला आमचा विजय निश्चित वाटत आहे” असा आत्मविश्वास मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, मेधा कुलकर्णी, महायुतीचे अन्य पदाधिकारी देखील हजर होते.
नारीशक्ती या देशांमध्ये पाहिजे ते परिवर्तन करू शकते. हे परिवर्तन पुणे जिल्ह्यामध्ये यापुढे झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरातून जास्तीत जास्त मते ही महिला काढू शकते. बचत गटाच्या माध्यमातून देखील महिला आमची लीड वाढवू शकतात असे मत दीपक मानकर यांनी यावेळी मांडले.
- बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार नाही तर सुळे विरुद्ध पवार अशी निवडणूक असणार
- सुप्रिया सुळे जर सुनेत्रा पवारांना आई मानतात तर संस्काराची जपणूक करावी. एक चांगली संधी आहे त्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा दीपक मानकर यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना केले. रक्ताची नाती जरी दुरावली असली तरी आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते अजित दादांशी वेगळ्या नात्याने जोडले आहोत त्यामुळे परिवर्तन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
- राजकारणामध्ये शैक्षणिक मुद्दा महत्त्वाचा आहे की नाही धंगेकर आमचे विरोधक असले तरी राज्याचे मुख्यमंत्री वसंत दादा यांचे हे चौथी पास होते. राजकारणामध्ये शिक्षण नाही तर सामाजिक बांधिलकी आणि समाजाचे काम याचा अभ्यास असणारी व्यक्ती देखील काम चांगल्या प्रकारे करू शकते. शैक्षणिक मुद्द्यावरून नाही परंतु कामावरून मुरलीधर मोहोळ हे निश्चित निवडून येणार असा आत्मविश्वास देखील दीपक मानकर यांनी यावेळी दिला.
@पुणे प्रतिनिधी – स्नेहल निमगिरे