मुंबई : अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनने आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यावर महाराष्ट्रभरातून एकीकडे आनंद व्यक्त होत आहे तर अभिनेते नाना पाटेकर यांनी मात्र सरकारला कडवट भाषेत फटकारले आहे.
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कडवट भाषेत टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाना पाटेकर यांनी लिहिले आहे कि, “मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत..त्याबद्दल अभिनंदन…जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा”.
नानांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत
कोथळा काढलाय पण तुम्हाला डोळ्यावरील पट्टीमुळे दिसत नाही,
भ्रष्टाचाराचा कोथळा काढायचा म्हणजे स्वत:च्या सरकारवर वार केल्यासारखं होईल,
महाराजांच्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढणार नाहीत,
उलट विरोधी व सत्ताधारी हे दोघेही भ्रष्टाचाराचा विरोध करतील आणि त्याचाच आर्थिक कोथळा काढतील, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.