मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत रोखठोक भूमिका मांडताना दिसून आले.
नेमकं काय म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
रविवारी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले होते. त्यांनी थेट आपला मोर्चा हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे वळवला होता. त्याचबरोबर त्यांनी गृहमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य देखील केल होत. तसेच त्यांच्याबाबत एकेरी भाषेत वक्तव्य देखील केले होते. जरांगे पाटील यांच्या या कृतीचा निषेध आता राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असतानाच आता एकीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका मांडताना म्हटला आहे की, ” राजकारण आपल्या स्तरावर चालत राहणार आहे. पण आज समाजाला विघटन करण्याचं काम चाललं आहे. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहेत ? कोणाचा पैसा त्यांच्यामागे आहे ? यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि तुम्ही कोणाची आयमाय काढणार असाल तर कसे चालेल ?”
” मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत एसआयटी चौकशी होणार आहे. माझी जरांगेनंसंदर्भात तक्रार नाही, पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे ? ही स्क्रिप्ट काही लोक रोज बोलतात, आता ती स्क्रिप्ट जरांगे बोलत आहेत. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉररम कोणी उघडली ? ही सर्व माहिती मिळून येत आहे. सर्व चौकशी करून हे षडयंत्र बाहेर आणू..!” असे यावेळी गृहमंत्र्यांनी म्हटला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे.