बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारकी मिळवण्याच्या शर्यतीत अनेक कुटुंबांमध्येच लढत होत असल्याच चित्र पाहायला मिळाल आहे. यातलं सर्वात गाजणार कुटुंब आहे ते म्हणजे पवार कुटुंब…बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे अजित पवारांच्या बंगल्यावर गेल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.
आज बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आहे. त्यामुळे आता मतदाता पवार कुटुंबातील सुनेला आपलं मत देतात की मुलीला हे काही दिवसात निश्चित होणारच आहे. आज मतदारांचा मत सीलबंद होणार आहे. एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातच आता प्रतिष्ठेची लढाई लढली जात आहे. एकमेकांवरच आरोप प्रत्यारोप होत असताना आज अचानक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे या थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाल्या. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला प्रचंड उधाण आले आहे.
Lok Sabha Election Updates : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सकाळच्या वेळेत सर्वाधिक मतदान; वाचा कोणत्या खासदाराचं भवितव्य आज होणार निश्चित
दरम्यान सुप्रिया सुळे या नेमक्या अजित पवार यांच्या बंगल्यावर का गेल्या आहे. त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, ” मी आशा काकी यांना नमस्कार करण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होते. मी फक्त काकींची भेट घेतली. हे माझ्या काका काकींचं घर आहे. माझ्या आयुष्यातील लहानपण याच घरात गेले आहे. मी या घरात दोन दोन महिने राहिले आहे. त्यावेळी दोन महिने माझ्या आईशी बोलणं होत नव्हतं. जेवढं माझ्या आईने माझं केलं नाही तेवढं माझ्या सर्व काकींनी केले आहे. असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत.