मुंबई : तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा Independent MLA Ravi Rana आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी जाहीर केलं होतं. दरम्यान त्यांच्या या घोषणेनंतर मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला या आरोपाखाली नोटीस देखील घडली होती. परंतु राणा दांपत्याने सातत्याने आपली ठाम भूमिका मांडल्याने राजद्रोहासह त्यांच्यावर इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच ज्या दिवशी आंदोलन करण्यात येणार होते त्यादिवशी राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक देखील केली. यावेळी वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या राणादांपत्य हे जामिनावर बाहेर असताना एक मोठी बातमी समोर येते आहे. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याची ही गुन्हे रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे.
राणा दाम्पत्याने मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा दावा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी या दांपत्याला अटक केली होती. त्यांच्यावरील गुन्हे रद्द करावेत यासाठी राणादांपत्याने मुंबई सत्र कोर्टात हे गुन्हे रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका रद्द करण्यात आली असून पुढील सुनावणीसाठी राणा दांपत्याला आता कोर्टात हजर राहावे लागणार आहे. याप्रकरणी आता मुंबई सत्र न्यायालयामध्ये पुढच्या वर्षी पाच जानेवारीला सुनावणी होणार असून राणा दाम्पत्यावर आता कोर्ट काय कारवाई करणार आहे हे लवकरच समजेल.