मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी झंझावाती दौरे आणि सभा करत आहेत. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या निवडणुकीच्या दगदगीने त्रास जाणवू लागला आहे. त्यांचा घसा खराब झाला असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या तब्येतीबाबत आलेल्या माहितीनंतर बारामतीतील सांगता सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले. यावरून आता विरोधकांनी खोचक टिप्पणी करायला सुरुवात केली आहे.
भाजपनेते गिरीश महाजन यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ” शरद पवार यांची तब्येत कमी जास्त असते. त्यांना त्रास होत असतो . त्यांच्या प्रकृतीवर बोलणं उचित होणार नाही. परंतु रोहित पवार दोन तीन शब्द बोलले की काय झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही. आणि त्या जिंकता सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे लोकांना तुम्ही फार काळ वेड बनवू शकणार नाही. असा खोचक सल्ला गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना दिला आहे.
” धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व खरं समोर येईल..! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजन विचारेंबाबत मोठा गौप्यस्फोट
तसेच ” मुद्द्यावर बोला, देशाच्या प्रश्नांवर बोला, कामावर बोला ! तर तुम्ही मत मागा. आता रोहित पवार यांना मी बघितल आहे की ते सभेत वारंवार रडतात. डोळे पुसतात. तुम्ही तरुण आहात तुम्ही म्हणतात की तुमच्या मागे मोठी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही मुद्द्यावर बोला आणि मत मागा.. ” असं देखील गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना सुनावल आहे.