मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करत आहेत. राजकारणामध्ये शाब्दिक चकमकीची पातळी देखील प्रचंड खालावली आहे. संजय राऊतांनी देखील आज असाच एक खळबळ जनक दावा केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंग केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी एक खोटे बोलणारी पिढी निर्माण केली. आदित्य ठाकरे यांनी पैसे सापडले हा जो आरोप केला आहे तो खरा आहे. एकनाथ शिंदे यांना धमकावलं आणि ते XXX ला पाय लावून पळून गेले. अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी आज केली आहे.
तसेच आमचं सरकार येऊ द्या. मग बघा देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार का ? असे देखील यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.
नाशिकमधून शांतिगिरी महाराजांचा पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल; ‘या’ कारणाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ दाखवून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरे हे सरड्यापेक्षाही जलद गतीने रंग बदलतात. यावर देखील संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी रंग बदललेले म्हणता. तुम्ही काय बदललं ? काय XXX बदलली का ? यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा बेडरपणा हा गुण घेतला नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे डरपोक आहेत. नरेंद्र मोदी हे अपघाताने पंतप्रधान झाले आहेत. चार जून नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर नसतील असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.