बारामती : बारामतीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो लिमिटेडने खरेदी केलेला कन्नडचा साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे.
ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकर जागा जप्त केली आहे. जपवळपास 50.20 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.
Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका ? हरीणं प्लास्टिक खातानाचा Video Viral