महाराष्ट्र : डॉक्टरांना मिळणार विद्या वेतन वेळेवर मिळत नसल्या कारणाने डॉक्टरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्य शासन यावर तोडगा काढत नसल्याच्या कारणाने काल गुरुवारी साडेपाच वाजल्यापासून निवासी डॉक्टरांनी संपाची Doctors Strike हाक दिली आहे.
राज्यभरातील निवासी डॉक्टरांना दिलं जाणारा विद्यावेतन वेळेवर मिळावं, तसेच होस्टेलची व्यवस्था चोख करण्यात यावी, आणि ज्या प्रमाणे केंद्रीय संस्थांमध्ये विद्यावेतन दिले जाते तसेच देवासी डॉक्टरांना दिले जावे या प्रमुख तीन मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
Doctors Strike : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार; संप मागे घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन,मात्र निवासी डॉक्टर संपावर ठाम
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर ठोस तोडगा काढला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं असून हा संप मागे घेण्यात यावा असे आवाहन देखील केलं आहे. परंतु निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांवर ठाम असून संप सुरू आहे.