धाराशिव : धाराशिव मधून एक मोठी बातमी समोर येते आहे. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज बाद होण्याची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच एक ट्विट करून माहिती दिली आहे.
विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” मध्यंतरी मी भरलेल्या नामनिर्देशन पत्र बाबत बातम्या बघून सर्व लोकांना काळजी वाटत होती की नक्की काय होतंय ? पण आत्ताच कळले की नामनिर्देशन अर्जात काहीही त्रुटी नाही. आणि तो मंजूर करण्यात आला आहे. म्हणून लगेच तुम्ही सर्वांना सोशल मीडियाद्वारे हे कळवत आहे. “
आई तुळजभवानीच्या आशीर्वादाने आणि मायबाप जनतेच्या आशिर्वाद आणि शुभेच्छा ने सर्व काही सुरळीत आहे. ही बातमी आल्यानंतर असंख्य सामान्य लोकांचे फोन आले, असंख्य लोकांनी काळजी दाखवली. असंख्य लोकांचे हे प्रेम, दाखवलेली काळजी हीच माझी कमावलेली पुंजी आहे पण आता एक सांगू इच्छितो फॉर्म संदर्भात काळजी नसावी.
आता आपल्या हक्का साठी लढायला तयार रहा. ही निवडणूक माझ्या खासदारकीची नव्हे तर सामान्य जनतेच्या हक्काची आहे मी फक्त तुमचा प्रतिनिधी म्हणून लढत आहे. असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिल आहे.
धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये आता भिडंत होणार आहे.