नवी दिल्ली : महायुतीमध्ये अद्याप देखील काही जागांबाबत तिढा सुटलेला नाही. यामध्ये एक जागा आहे ती म्हणजे साताऱ्याची… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जावी यासाठी एकीकडे समर्थक आक्रमक झाले आहेत. तर स्वतः उदयनराजे भोसले हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेली तीन दिवस झाले दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. परंतु अद्याप उदयनराजे भोसले यांना अमित शहा यांची भेट देखील मिळू शकली नाहीये.
दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत मोठ वक्तव्य केल आहे. ते म्हणाले की, ” समजा उद्या मी हा प्रश्न विचारतो. साताऱ्यात उदयनराजेंना महायुतीने जागा दिली तर ते त्यांची निवड बिनविरोध करणार आहेत का ? त्यांचाही सन्मान आहे ना, मग ते बिनविरोध करणार आहेत. त्यांनी सांगावं, घोषित करावे की उदयनराजेंना आम्ही बिनविरोध करणार आहोत. हे राजकारण आहे. यापूर्वी देखील त्या घराण्याने निवडणुका लढवल्या नाहीत असं नाहीये. एकमेकांसमोरही लढवल्या आहेत. राजकारणात अशा मागण्या होत असतात असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
पहिले तीन दिवस झाले. उदयनराजे भोसले हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यावर देखील अमित शहा यांची अद्याप देखील भेट का होऊ शकली नाही असा सवाल पत्रकारांनी विचारला असता फडणवीस म्हणाले की, ” उदयन राजेंची भेट आज गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होईल ते त्यांचं मत गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडतील त्यानंतर जो काही निर्णय आहे तो गृहमंत्री अमित शहा घेतील. ” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगून टाकल आहे.