मुंबई : मराठा आरक्षण Maratha Reservation या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी पहिल्यांदाच थेट वक्तव्य केल आहे. यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचंही नाव न घेता आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून निवडणुकीवर परिणाम नाही असं स्पष्ट मत व्यक्त केल आहे.
एकीकडे अध्यादेशाची अंमलबजावणी होऊन कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांच उपोषण सुरूच आहे. आज उपोषणाचा ८ व दिवस आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना ओबीसी मधून आरक्षण होते तसेच दिले जाईल आणि इतर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिला जाईल अशी घोषणा केली. दरम्यान त्यानंतर आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून निवडणुकीवर परिणाम होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ” मराठा समाजाचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. आरक्षण दिल्याने सरकार पडतं की नाही पडत माहित नाही, तर मराठा आणि मराठा समाज काहीही करू शकतात हे मला माहित आहे. असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केला आहे.