मुंबई : 20 जानेवारीला जालन्यातील अंतरवाली सराटी मधून निघालेलं जरांगे पाटील यांच्यासोबत भगवं वादळ आता मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी !”
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा बडगा उगारला असून मुंबईच्या आझाद मैदानावर ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. आझाद मैदानाची परवानगी मुंबई पोलिसांनी फेटाळली असली तरीही हे आंदोलन होणार अशी भूमिका पाटलांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि, ” आम्हाला काही निर्देश देण्यात आले आहेत. कोणालाही आंदोलन करण्याचे अधिकार आहेत. पण ते शांततेने झाले पाहिजे. नियमाने झाले पाहिजे अशाप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने सांगितले आहे त्याचा आम्ही तंतोतंत पालन करू. त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.”