मुंबई : भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी (Bhandup Police) आज अटक (Datta Dalvi Arrest) केली. त्यानंतर भांडूप पोलिस स्टेशनबाहेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी दत्ता दळवी यांना न्यायालयात हजर केले. कोर्टाने दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली.
यावेळी माध्यमांशी बोलताना माजी महापौर दत्ता दळवी म्हणाले कि, ” मी भूमिकेवर ठाम आहे. धर्मवीर चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांनी ज्या शब्दाचा वापर केला होता, त्याच शब्दाचा वापर मी केला. मालवणी भाषामध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या नाहीत, असेही दत्ता दळवी म्हणाले. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सुडाच राजकारण आहे, असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला.