मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर भाजपला BJP अबकी बार 400 पार असा नारा दिला आहे. पण या भाजपच्या नाऱ्यावरूनच काँग्रेसन भाजपवर नवीन आरोप लावला आहे. भाजप 400 पार गेली तर संविधान बदलेल असा प्रचार कॉंग्रेस करत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी Deputy Chief Minister Ajit Pawar काँग्रेवसवर हल्लाबोल केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला चारशे पेक्षा जास्त जागा मिळाल्यास संविधानात बदल करण्यात येईल असा अपप्रचार काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असून हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसवर यावेळी हल्लाबोल केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सोयीच राजकारण करतो. बाबासाहेबांना विरोध केला. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने पराभव ही केला होता. मुळात काँग्रेसचे कधीही संविधान दिवस साजरा केला नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली असे अजित पवार म्हणाले आहेत.