हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसून येत आहेत. राजकारणामध्ये अनेक बड्या नेत्यांच्या जीभ देखील घसरल्याचं चित्र आहे. हिंगोलीमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर तोफ डागली आहे.
हिंगोलीमध्ये सभेतून उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की , ” महाविकास आघाडी नें 4 सिंचन प्रकल्प मंजूर केले, तर आपण 122 सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. 60 वर्षात गरिबी हटाव असा नारा होता. मात्र, गरिबी हटली नाही. पण, मोदी सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीच्या वर आणल्याचं शिंदेंनी सांगितलं. तसेच, समोरच्या लोकांकडे मुद्दे नाहीत, ते भ्रमिष्ठ झाले आहेत, बाप एक नंबरी अन् बेटा 10 नंबरी असल्याची बोचरी टीका यावेळी, एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर केली. तर, जे म्हणत होते सरकार पडणार त्यांना खरा ज्योतिष मिळाला नाही, असे म्हणत संजय राऊतांवरही निशाणा साधला.कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, म्हणूनच निवडणुकीत बाबुराव कदम विरोधकांच्या नाकावर टिचून जिंकणार,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
Lok Sabha Election 2024 : ” देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरून उरला…! ” सदाभाऊ खोतांची बोचरी टीका
हिंगोलीमध्ये महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आज सभेसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी बाबुराव कदम यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, ” महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हा शेतकऱ्याचा मुलगा असल्याची साद मुख्यमंत्र्यांनी मतदारांना घातली. महायुतीमध्ये मी आणि देवेंद्रजी काम करत असून शेतकऱ्यांसाठी योजना काढल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे. काल रात्री गारपीट झाली. सध्या निवडणूका आहेत, मात्र मी स्वतः नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.