शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे Dr. Amol Kolhe यांनी शिरूर लोकसभेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा असल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर आता थेट छगन भुजबळ Chagan Bhujbal यांनी देखील स्पष्टीकरण देत सहमती दर्शवली आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड आग्रही असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत माघार घेतली. बराच मोठा कालावधी लोटला तरी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघावर कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झाला नाही. यामुळे महायुतीला याचा फटका बसू शकतो असे कारण सांगून छगन भुजबळ यांनी माघार घेतली. दरम्यान आता शिरूर लोकसभेसाठी देखील त्यांच्या नावाची चर्चा होती. असागौप्यस्फोट डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ
डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या यावर स्पष्टीकरण देताना म्हंटले आहे कि, ” नाशिकमधून माझे नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढता का ? अशी विचारणा केली होती. शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता. मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.