Chandrashekhar Bawankule Casino Photo : सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापलेलं असताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा यांचा एक फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर या फोटो मागोमाग भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत एक्स अंकाऊटवरुन आदित्य ठाकरेंचा फोटो शेअर करण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे. (Chandrashekhar Bawankule Casino Photo Viral Bjp sanajy rait aditya thackrey)
चंद्रशेखर बावनकुळेंचा त्या फोटोत काय?
मराठा-कुणबी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेत असताना आता ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे नाट्य सुरु झालंय. एकमेकांचे वादग्रस्त व्हिडीओ, फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली जात आहे. त्या फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसिनोमध्ये जुगार खेळताना दिसत आहेत. हा फोटो 19 नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,वेनेशाइन इथला फोटो असल्याचा दावा संजय राऊतांन केलाय.
संजय राऊतांचा त्या फोटोवर सवाल
चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात, असे राऊतांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा खोचक प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे भाजप महाराष्ट्रच्या एक्स अकाऊंटवरुन आदित्य ठाकरेंचा कथित फोटो शेअर करण्यात आला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचा त्या फोटोवर स्पष्टीकरण
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो. तेथील हा परिसर असल्याचे बावनकुळे म्हणाले. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.