चंद्रपूर : चंद्रपूरचे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गंटीवार यांच्या प्रचाराचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला आहे. आज मुनगंटीवारांच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे चंद्रपुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित चंद्रपूरकरांना संबोधित करताना चंद्रपूरचे भरभरून कौतुक केले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चंद्रपूर मधून एवढं प्रेम मिळणं माझ्यासाठी विशेष आहे. याच चंद्रपुरातून राम मंदिरासाठी काष्ट पाठवण्यात आलं. नव्या संसदीय भवनमध्येही चंद्रपूरचे काष्ट लावले आहे. त्यामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण देशात आहे. असं चंद्रपूरच कौतुक सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि उपस्थित चंद्रपूरकरांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
https://www.facebook.com/share/v/oYHWMHXcqdz8jURP/?mibextid=qi2Omg
यावेळी काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ” एकीकडे भाजप आणि एनडीए आहे देशासाठी ठोस मोठे निर्णय घेण्याचे काम आम्ही करतो दुसरीकडे काँग्रेस आहे जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी त्यांची भूमिका आहे.” असा थेट हल्लाबोल नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच ‘ एक स्थिर सरकार किती गरजेचं आहे हे महाराष्ट्र शिवाय कुणाला माहिती आहे. इंडी अलायन्सची जोपर्यंत देशात सत्ता होती तोपर्यंत त्यांनी महाराष्ट्राची उपेक्षा केली. जनादेश नाकारत राज्याच्या सत्तेत पोहोचले. तेव्हा त्यांनी स्वतःचा आणि परिवाराचा विकास केला. कोणाचे कंत्राट कोणाला मिळणार कोणाच्या खात्यात किती येणार यामध्ये महाराष्ट्राचे भविष्य खराब केले. कुठलाही प्रकल्प असो कमिशन द्या नाहीतर कामाला ब्रेक लावा. हे सुरू होतं त्यांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. सिंचन प्रकल्प बंद केला. विदर्भ विकासासाठी मी समृद्धी महामार्ग लोकार्पण केलं. त्याचाही काँग्रेसने विरोध केला होता. असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.