मुंबई : जालन्यामध्ये अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केल आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची प्रकृती प्रचंड प्रमाणात खालावली आहे. नाकातून रक्तस्राव आणि मोठ्या प्रमाणावर पोटदुखीचा ते सामना करत आहेत. हे सर्व होऊन देखील ते उपचार घेण्यास आणि पाणी देखील पिण्यास नकार देत आहेत. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात Bombay High Court याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आता हाय कोर्टाने जरांगे पाटील यांना फटकारल आहे.
आज या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्यास अडचण काय आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. मनोज जरांगे यांना औषधोपचार घ्यायला सांगा, फक्त सलाईन लावणं म्हणजे उपचार होत नाही. उपचार घेण्याच्या सूचना कळवा असं यावेळी हायकोर्टाने पाटील यांच्या वकिलाला सुनावल आहे. तसेच आज चार वाजेपर्यंत रिप्लाय द्या असे देखील कोर्टाने सांगितलं होतं.
MARATHA RESERVATION : … अन्यथा पुन्हा मुंबईत येणार ! जरांगे पाटील यांची प्रकृती खालावतेय, पण मागणीवर ठाम !
आज कोर्टामध्ये महाधिवक्ता यांनी मनोज जरांगे पाटील हे डॉक्टरांना सहकार्य करत नाही अशी माहिती दिली होती. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या उपोषणामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाली असल्याची माहिती कोर्टासमोर दिली. त्यामुळे आता जरांगे पाटील यांना फटकारल असून त्यांना आता उपचार घेणे बंधनकारक होणार आहे.