काँग्रेसचे Congress माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढू शकतात. भाजपने BJP निवडणूक आयोगाला Election Commission पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स निलंबित करण्याची मागणी केली आहे. भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांचे एक्स अकाऊंट तात्काळ निलंबित करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.
राहुल गांधींविरोधात भाजपची तक्रार
याशिवाय राजस्थानच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना राहुल गांधी यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करून फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांचे नाव न घेता राहुल यांनी त्यांना ‘पनौटी’ म्हटले होते. काँग्रेस खासदाराच्या वक्तव्यावरून भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी नेहमीच्या शिष्टाचाराचा विसर पडले आहेत.