बिल्किस बानो प्रकरण : सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना मोठा झटका दिला आहे. तुरुंग प्रशासनासमोर शरण येण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करणारी दोषींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. दोषींना २१ जानेवारीला संपेपर्यंत आत्मसमर्पण करावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना म्हंटले आहे कि, बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ११ दोषींनी आत्मसमर्पणाची मुदत वाढविण्यामागे जी कारणे दिली आहेत. गुजरात सरकारने माफी म्हणून या सर्व दोषींची सुटका होण्यापूर्वीच तुरुंगातून सुटका केली होती. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांसह अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले. त्यानंतर सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ८ जानेवारी रोजी सुनावणी झाली, त्यात न्यायालयाने दोषींना दोन आठवड्यांत तुरुंगात शरण येण्याचे आदेश दिले आहेत.
गुजरात सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
सर्वोच्च न्यायालयाने ८ जानेवारी रोजी या प्रकरणातील ११ दोषींना शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द बातल ठरवला होता. न्यायालयाने दोषींना २१ जानेवारीपर्यंत तुरुंग प्रशासनासमोर शरण येण्यास सांगितले होते.