मुंबई : नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. आता या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे. नबाम रेबिया केसची चर्चा महाराष्ट्रात जोरदार सुरू होती. या केसचा शिवसेनेतील फुटीच्या केस वेळी संदर्भ देण्यात आला होता. आता या नबाम रेबिया प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे.
सुप्रीम कोर्टात उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबरला सात न्यायमूर्तींच्या न्यायपिठासमोर या प्रकरणास सुरुवात होणार आहे. शिवसेनेतील दोन गटातील फुटी नंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. यावेळी नबाम रेबिया या प्रकरणाचा देखील संदर्भ देण्यात आला होता. दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी घेत असताना रेबिया प्रकरण महाराष्ट्राला लागू होत नसल्याचं सरन्यायाधीश यांनी म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात बाधा निर्माण झाली. या मुद्द्यावरून नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख या प्रकरणात होऊ शकतो. परंतु महाराष्ट्राच्या प्रकरणांमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आलेली नाही. अपात्रतेच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी दोन दिवसांची मुदत सदस्यांना दिली होती. मग हे सदस्य कोर्टात आले आणि कोर्टाने 12 जुलै पर्यंत नोटीसला उत्तर देण्याची मुदत वाढवली आणि याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे बहुमत चाचणीला सामोरे न जाता तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले असं कोर्टाने म्हटलं
नाबाम रेबिया केस नेमकी काय ?
2016 साली सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेऊन अरुणाचल प्रदेशमध्ये बरखास्त झालेले मुख्यमंत्री नबाम तूकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार पुन्हा बहाल करण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाने गुवाहाटी हायकोर्टाचा 14 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय रोखणारा निकाल योग्य ठरवला होता. सुप्रीम कोर्टाने राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांचा विधानसभा सत्र जानेवारी 2016 ऐवजी ऐवजी डिसेंबर 2015 मध्ये बोलवण्याचा निर्णय अयोग्य ठरवला होता.