मुंबई : महाराष्ट्र आणि खरंतर संपूर्ण देश ज्या निकालाची प्रतीक्षा करत होता,त्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरु केले आहे. वाचनाच्या सुरवातीलाच शिवसेना नेमकी कुणाची या महत्वाच्या मुद्यावर निकाल जाहीर करताना राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाकडे विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना पक्षची घटना मागितली होती. निवडणुक आयोगाने घटनेची एक प्रत दिली पण त्यावर तारीख नव्हती. त्यामुळे 2018 ची घटना स्वीकारता येणार नाही. 2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नाहीत. 2018 ची घटना ग्राह्य धरण्याचा उद्धव ठाकरे गटाचा दावा अमान्य असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना आल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.