नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने सर्व राज्य सरकारांना तीन वर्षे पूर्ण झालेल्या किंवा आपापल्या जिल्ह्यात असलेल्या निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. पण सत्ताधाऱ्यांच्याच आशीर्वादाने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही महत्वाच्या खुर्चीवर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई कशी होणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, महाराष्ट्राने काही महापालिका आयुक्त आणि काही अतिरिक्त व उपायुक्तांबाबत च्या निर्देशांचे पालन केले ले नाही. आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अहवाल सादर करून महापालिका आणि अतिरिक्त व उपायुक्तांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या सामान्य प्रशासकीय विभागांच्या सचिवांना हटवण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत समान संधी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या सामान्य प्रशासकीय विभागांच्या सचिवांना हटवण्यात आले आहे.