मुंबई : आणि अखेर अनेक महिन्यांपासून सुरू असलेला लढा आज विजयाचा गुलाल उधळतो आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आणि त्या आधीपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेली धडपड याला आज राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे.
दोन वेळा आमरण उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने दिलेलं आश्वासन आज थेट हातात अध्यादेश देऊन पूर्ण करण्यात आल आहे. 20 जानेवारीचा अल्टिमेटम होता. सात दिवस पदयात्रा करून जालन्याच्या अंतर्वली सराटीतून जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत सह ते भगव वादळ मुंबईच्या दिशेने सरपंच होतं.
राज्य सरकारच्या काळजात धडकी भरवणार हे वादळ मुंबईत पोहोचलं आणि प्रचंड वेगाने हालचाली सुरू झाल्या आणि अखेर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला.
अध्यादेशात नेमकं काय ?